करमाळा प्रतिनिधी

झरे ता. करमाळा जि. सोलापूर येथील ध्येय वेडा तरुण दिग्दर्शक अमोल खंडू काळे यांची याडपाट वेब सिरीज महाराष्ट्र भर धुमाकूळ घालत आहे. अमोल काळे हे शेतकरी कुटुंबातील १ मुलगा शेतीतील कामे करून ते वेब सिरीज करतात. विषेश म्हणजे याडपाट वेब सिरीज हि सोलापूर जिल्ह्यातील २०० भाग पुर्ण करणारी १ली वेब सिरीज आहे. ह्या आगोदर अमोल काळे यांचे बलुती, स्मशानातील सोनं, छबीन्या, बाप लेक, बाप माणूस हे लघुपट खूप गाजले व अमोल काळे यांना २१ पुरस्कार देऊन गेले.

त्यामुळे त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले व याडपाट वेब सिरीज चे काम हातात घेतले व बोटावर मोजणारे वेब सिरीज मध्ये अमोल काळे यांच्या वेब सिरीज चे नाव महाराष्ट्र भर झाले आहे. विषेश म्हणजे अमोल काळे यांनी याडपाट वेब

सिरीज मध्ये मेन रोल करत दिग्दर्शक,  कॅमेरामन, कथा, एडिटर निर्मिती हे सगळे काम एकटे दिग्दर्शक काळे करतात. फिल्मचा कोणता अनुभव नसताना फक्त जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर हे केले. जसे म्हटले जाते की एक यशस्वी

माणसाच्या मागे कोनतरी असते ते म्हणजे आई वडील काळे परिवार व याडपाट टीम तर अशा ध्येय वेडा दिग्दर्शक अमोल काळे यांना आमच्या कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *