करमाळा प्रतिनिधी

भैरवनाथ प्रतिष्ठान, हिंगणी आयोजित श्री गणेश उत्सव निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमा पैकी दिनांक २६/०९/२०२३ रोजी सर्वानुमते रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून रक्त दान करून

सहकार्य केले. या शिबिरामध्ये ८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे काम श्री कमला भवानी ब्लड सेंटर करमाळा यांच्याकडून घेण्यात आले होते.

रक्त दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि गरजूंना केलेली एक मदत असते. शिबिराची वेळ 10:15 मिनिट सकाळी, ठिकाण विठ्ठल मंदिर हिंगणी.

प्रत्येक रक्त दात्यास एक पाण्याचा जार किंवा एक स्मार्ट वॉच असे बक्षीस देण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *