करमाळा प्रतिनिधी

बहु चर्चित करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करून जयवंतराव जगताप हे किंग मेकर ठरले असून मार्केट कमिटीच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक बिनविरोध झाली आहे.

नेतृत्व करणारे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा सत्कार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी करमाळा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष अँड. कमलाकर वीर, नगरसेवक प्रशांत ढाळे, मासाहेब पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र चिवटे, पत्रकार संजय मस्कर, नागेश शेंडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे, युवा नेते अरुण काका जगताप, मार्केट कमिटीचे सचिव विठ्ठल शिरसागर, सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर वांगडे, रवींद्र उकिरडे, आदि जण उपस्थित होते.

यावेळी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय जीवन शैलीवर आधारित रोखठोक हे पुस्तक जगताप देण्यात आले.

जयवंतराव जगताप यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत सातत्याने रोखठोक भूमिका घेतली. यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय चरित्रावरील रोखठोक पुस्तक भेट देण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *