
खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर सोमवार, मंगळवार करमाळा दौऱ्यावर :- गणेश चिवटे
करमाळा :- माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दि.4 आणि 5 (सोमवार, मंगळवार) दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्य तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,माढा लोकसभेचे खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर करमाळा तालुक्याच्या दोन दिवसाच्या गावभेट दौऱ्यामध्ये सोमवार दि ४ रोजी करमाळा,श्री देवीचामाळ,पांडे, मिरगव्हाण,अर्जुननगर,शेलगाव, हिसरे,हिवरे,कोळगाव,निमगाव,गौडंरे,नेर्ले येथे दौरा करणार असुन दुसर्या दिवसी मंगळवार दि. ५ रोजी देवळाली,खडकेवाडी, कुंभेज,पोफळज,उमरड,झरे, अंजनडोह,पोंधवडी,विहाळ,मोरवड,
पिंपळवाडी,वीट या गावाची भेट घेणार आहेत. दौऱ्यामध्ये ते या सर्व गावामध्ये खासदार निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. तरी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या,निवेदने खासदारांना द्यावीत असे आवाहन चिवटे यांनी केले आहे.
