जेआरडी माझा

डिकसळ ते कोंढार चिंचोलीचा नवीन होणारा पुल आपल्या सर्वांचे करीता केलेली खुप मोठी सुविधा आहे, हे दादा आणि मामांचे काम चिरंतन ध्यानात राहील असे काम आहे.

रस्ता नसला की रस्त्याची किंमत कळते, तुम्ही आम्ही किती तरी दिवस या ब्रिटीश कालीन पुलावरून जातोय-येतोय, पण जुना पुल ब्रिटीश कालीन असल्यामुळे त्याची मर्यादा संपत चाललेली होती, जुना पुल भक्कम वाटत असला तरी आज कुठे कुठे

कमकुवत झालेला आहे. त्यावरून होणारी जड वहातुक कशी बशी थांबलेली आहे. परंतु या ठिकाणी होणाऱ्या प्रचंड वहातुकीचा व प्रवाशांचा विचार करता येथे नविन पुल व्हावा अशी मागणी होती आणि गरजही.

अनेक नेते मंडळी यांची आश्वासने मिळाली परंतु हाती काहीच आले नाही. परंतु भागोदय झाला आणि राजकारणा पेक्षा विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व आ. संजयमामा शिंदे यांचे रुपाने तालुक्याला लाभले. अगदी सुरुवातीच्या वर्षापासुनच

मामांनी जीव तोडून पाठपुरावा केला, परंतु कोव्हीड-१९ मधे गेलेली दोन वर्षे, त्यानंतर सरकार ची पडझड यामुळे विकास कामांना खीळ बसली, अशाही परिस्थिती संयमाने मामा सर्व परिस्थिती हाताळत होते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुध्या प्रथमपासुनच या कामासाठी आग्रही राहीले, त्यांनी सुरुवातीलाच या नविन पुलासाठी ५५ कोटी रुपये मंजुरी देखिल दिली होती परंतु पुढे सरकार बदलले त्यामुळे हा पुल होणार की नाही अशी परिस्थिती आली, या कामाबाबत आणि अनेक विकासाचे कामी मामासाहेब अलर्ट होते, काहीही करून हा ब्रीज झालाच पाहीजे याकरीता जिकरीचे प्रयत्न चालुच ठेवले होते. शेवटी भागोदय झालाच, सत्तेच्या सारीपाटात पुन्हा एकदा अजितदादांची एण्ट्री आणि त्याला मामांची साथ यामुळे असाध्य अशी गोष्ट शेवटी साध्य झाली ती केवळ दादा आणि मामांमुळेच!

करमाळा तालुक्यातील अनेक विकासकामे अडविण्याचे षडयंत्र आणि चुकीचे राजकारण काही लोकांनी केलयं, त्यांना जनता चपराक देईलच, परंतु राजकारणासाठी विकास कामांना ब्रेक लावण्याचे पाप काही राजकारणी करतात याचे वाईट वाटते. आता डिकसळ- कोंढार चिंचोली पुलासह अनेक विकास कामे पुन्हा एकदा चालु होत आहेत. करमाळा तालुका गेली अनेक वर्षे योग्य नेतृत्व आणि विकासापासुन दूर जात होता, परंतु आमदार. संजयमामा यांच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे पासुन विकासकामावर चर्चा होऊन स्पर्धा होऊ लागली. करमाळा तालुक्यात, शहरात आज अनेक विकासकामे होत आहेत याचा आनंद निश्चितपणे प्रत्येकाचे चेहऱ्यावर आहे. अनेक कठीण परिस्थितीतुन शासन जात असताना देखिल करमाळा तालुक्यात सार्वजनिक शांतता यासह आरोग्य, वीज, पाणी, रस्ते याबाबतीत बरीच कामे मार्गी लागलेली असुन, विकास कामांची गती निश्चितपणे वाढलेली आहे. या सर्व विकास कामांमधे आपल्या पश्चिम भागातला महत्वाचा असणारा प्रश्न डिकसळ- कोंढार चिंचोली पुल होता आणि आज त्याचे काम चालु झाले असुन ही दादा आणि मामाची आपल्या साठी खुप मोठी उपलब्धी आहे असे म्हणावे लागेल. आपल्यासह  पुढील अनेक पिढ्या यामुळे दादा व मामांना आशिर्वाद देतील. तुम्हा आम्हाला फक्त यावरच थांबायचे नाही, करमाळा तालुक्यात अनेक विकासाची कामे आणायची आहेत यासाठी दादा आणि मामां सारखे कणखर आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्वांची गरज आहे, कोणावरही टिका टिप्पणी न करता योग्य नियोजन आणि संयमाने विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत आणणारे आमदार संजयमामा आणि आपल्या स्वयं कर्तृत्व आणि नेतृत्व याची छाप टाकुन स्पष्टवक्ते पणाने जे ठरवलयं ते तडीस नेहणारे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना करमाळा तालुकावासिय आणि विशेषतः पश्चिम भागातील तमाम नागरिकांचे साक्षीने मानाचा मुजरा आहे! ॲड. अजित सर्जेराव विघ्ने, केत्तुर, ता- करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *