करमाळा प्रतिनिधी
देशभरात बुधवारी रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना रावगांव मध्ये प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने झाडांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
यावेळी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे बोलताना म्हणाले की, झाडे ही माणसाला जगण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी माणसांनेही जागरूकता दाखवली पाहिजे यासाठी आम्ही प्रेरणा मानव विकास
प्रतिष्ठानच्या वतीने झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करत आहोत आपल्याला झाडापासून ऑक्सिजन मिळतो या झाडाच्या आधारे आपण जगतो हेच आपण विसरून चाललो आहोत आपण निसर्ग जपण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. या
सणाच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने निसर्ग रक्षणाचा विचार आणि गरज समाजापर्यंत पोहोचवली तर निसर्गाचे रक्षण होईल अशी आशा कांबळे यांनी बोलताना व्यक्त केली यावेळी रावगाव ग्रा.पं. सदस्या अविदाताई कांबळे, प्रियांका कांबळे,
शितल कांबळे, दिपाली कांबळे, प्रेरणा कांबळे, संगिता पवार, कौशल्या आलाट, आदि सह महिलांनी झाडाला राख्या बांधून पर्यावरणमय रक्षाबंधन साजरे केले.