करमाळा प्रतिनिधी
रविवार दि.27ऑगस्ट 2023 रोजी कर्मवीर अण्णासाहेब जगताप हायस्कूलमधील 1990-91 साली दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर पार पडले. जवळपास 32 वर्षांनी सर्वजण एकमेकांना भेटणार होते. म्हणुन प्रत्यक्षात सगळेजण फार
उत्सुक होते. दहावी पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रत्येक जण आपापल्या वाटेने वेगवेगळ्या दिशांना विखुरले गेले. मग या सगळ्यांना एकत्र कसे आणायचे हाच मोठा प्रश्न होता. सर्वप्रथम यात डॉ.रविंद्र काटुळे यांनी पुढाकार घेऊन “स्कूल
फ्रेड्स” या नावाने व्हॉट्स अप गृप तयार केला. सुरूवातीस करमाळ्यातच राहत असलेल्या मित्रांना यामध्ये सामील केले. मग गृपवर आवाहन करून इतरही मित्रांचे नंबर्स मिळवण्यासाठी प्रयत्न केले. बघता बघता ५२ जणांचा ग्रुप झाला. गेट टुगेदर
विषयी चर्चा होऊ लागली. पहिले स्नेह संमेलन करमाळ्यातच घेण्याचे ठरले. कारण जेथून सगळे अलग झाले होते तिथेच परत एकदा सगळ्यांनी जमायचे असे ठरले. कार्यक्रमाचे नियोजन कसे करायचे हे ठरवण्यासाठी दोनवेळा बैठक घेण्यात आली.
बाहेरगावी राहत असलेल्या मित्रांना नियोजन करता यावे म्हणून पंधरा दिवस आधीच तारीख जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाची सगळी तयारी करण्यासाठी डॉ.रवि काटुळे आणि सचिन कटकदौंड यांनी खुप मेहनत घेतली. अगदी हालगी
वाल्यापासून हाॅटेलचा मेनू ठरवण्यापर्यंत त्यांनी सगळे काही व्यवस्थित पार पाडले. कार्यक्रमासाठी प्रत्येकाकडून वर्गणी गोळा करण्यात आली. या कार्यक्रमात शिक्षकांविषयी आदर व्यक्त करता यावा म्हणून त्यांनाही आमंत्रित करण्यात आले. गेट टुगेदरच्या या कार्यक्रमात ४५ विद्यार्थी आणि १५ शिक्षक हजर होते. आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम काम करत असल्याचे ऐकून शिक्षकही अगदी भारावून गेले होते. विद्यार्थांकडुन झालेला सत्कार हा सगळ्यात मोठा असल्याचे काही शिक्षकांनी आपल्या मनोगतात सांगितले. काही विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. शाळेतील काही गमती जमतीही त्यांनी सांगितल्या. एकंदरीत हा कार्यक्रम हसतखेळत पार पडला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कॅप्टन म्हणून जरी डॉ.रवि काटुळे यांनी नेतृत्व केले असले तरी त्यांना समर्थ साथ सचिन कटकदौंड आणि इतर मित्रांनी दिली. अॅड.सुहास मोरे आणि डॉ.विनोद गादिया यांनीही उणिवा भरून काढण्यासाठी सुचना केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विनोद गादिया यांनी उत्कृष्टपणे केले. करमाळ्यात राहत असलेल्या हेमंत बिडवे, जयराम पवार, जीवन पवार, राजेंद्र मेरगळ, किसन कांबळे, नवनाथ बागल, लाला जव्हेरी, मलिक पिंजारी, रुपेश अंकुशखाने, दिनेश जाधव या सर्व मित्रांनीही मिटिंगला हजर राहून आपले विचार मांडले. कार्यक्रम कसा पार पाडता येईल यासाठी सर्वांनीच खूप मेहनत घेतली. काही दिवसांनी परत एकदा स्नेह संमेलन घ्यायचे आश्वासन एकमेकांना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शिक्षक गुलाबराव बागल सर, अशोक काटुळे सर, पांडुरंग वीर सर, रमेश कवडे सर, बाबुराव इंगळे सर, गोविंद परिट सर, अर्जुन फंड सर, बाबासाहेब देशमुख सर, घोडके सर, जाधवर सर, जगताप सर, सुनील जाधव सर, खोसे मॅडम, पलंगे मॅडम, निफाडकर मॅडम हे शिक्षक हजर