करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील साखर कारखानदारांनी एक रकमी एफ. आर. पी. देण्यात यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये तीन टप्प्यांमध्ये एफ. आर.
पी. देण्याचे ठरले होते त्याच पद्धतीने आताही काही साखर कारखानदार शेतकऱ्याकडून करारनामा करून घेत आहे व कागदपत्रावर सह्या घेत आहेत. तरीही कुठल्याही शेतकऱ्यांनी कारखानदाराच्या कुठल्याही कागदावर सही करू नये व करारही
करू नये शेतकऱ्यांना लुटण्याचे काम हे साखर सम्राट करत आहे. उसाची एक रकमे एफ. आर. पी. देण्यात या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाब रावभाऊ पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माऊली भाऊ जवळेकर यांच्या
नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिली. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे
तालुकाध्यक्ष शिवाजी बनकर, तालुका उपाध्यक्ष निलेश पडोळे, बाळासाहेब माने, प्रकाश काळे, संपत गव्हाणे, देविदास तळेकर, भालचंद्र इवरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.