करमाळा प्रतिनिधी

दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा कर्मयोगी कुस्ती केंद्र पारगाव या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दत्तकला शिक्षण संस्थेचे

विद्यार्थ्यांनी 14, 17, 19 अशा विविध गटांमध्ये सहभाग नोंदविला होता. यामध्ये 12 विद्यार्थ्यांचे यश मिळविले.

विजेते विद्यार्थी पुढील प्रमाणे:-

1)श्रावणी नंदकिशोर पाटील 14 वर्षाखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात 46 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक.

2) वैष्णवी तानाजी मोघे 17 वर्षाखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात 61 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक.

3) अंजली शरद देशमुख 19 वर्षाखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात 53 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक.

4) प्रेरणा नितीन भोसले 19 वर्षाखालील फ्री स्टाईल या कुस्ती प्रकारात ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक.

5) अंकिता शिवाजी कुंभार 19 वर्षाखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात 61 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक.

6) अथर्व किरण कुमार मोरे 17 वर्षाखालील ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत 55 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक.

7) गौरी समरसिंग भोसले 14 वर्षाखालील फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत 55 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक.

8) अमृता किसन मेरगळ 17 वर्षाखालील फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत 46 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक.

9) संचिती सचिनकुमार मेरगळ 17 वर्षाखालील फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात 65 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक.

10) समृद्धी आबा जरांडे 17 वर्षाखालील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात 42 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक.

11) बनिता लंबोदर प्रधान 17 वर्षाखालील फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात 53 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक.

12) अजय दिगंबर तीरेकर 19 वर्षाखालील ग्रीक रोमन कुस्ती प्रकारात 55 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक.

या सर्व विजेते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दत्तकला शिक्षण संस्थेचे क्रीडा शिक्षक प्रदीप सुनील शिवपुजे सर यांनी केले.

तसेच प्रथम आलेल्या 6 विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ सर, उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी सर, सचिवा माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर, (सी.बी.एस.सी.) प्राचार्य नंदा ताटे मॅडम, (एस.एस.सी.) विभाग प्रमुख प्राचार्य सिंधू यादव मॅडम, प्राध्यापक खाडे मॅडम, प्राध्यापक धर्मेंद्र धेंडे सर, प्राध्यापक रघुनाथ झोळ सर व सर्व शिक्षक वृंदावन विजेत्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *