करमाळा प्रतिनिधी
मौजे कोंढार चिंचोली येथील साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान यांच्या वतीने आण्णा भाऊ साठे याच्या 103 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. त्या कार्यक्रमात देविदास आप्पाच्या सामाजिक कामाची दखल घेऊन व त्यांनी
कोंढार चिंचोली ते डिकसळ पुलासाठी सतत शासन दरबारी पाठपुरावा केला व सदर नवीन पुलाच्या मंजूरी पासून ते पुलाची वर्क ऑर्डर (कार्यारंभ) आदेश घेणे साठीही मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या कडे पाठपुरावा व
रस्त्या साठीही 1986 सालापासून, रस्ता रोको आंदोलन, उपोषण, सतत पत्र व्यवहार करून शासनास जागे केल्याची दखल घेऊन आण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान कोंढार चिंचोली च्या वतीने प्रतिष्टन अध्यक्ष मनोहर लांडगे तसेच भरत लांडगे, बापू लांडगे,
कुचेकर सर यांच्या वतीने दि. 5/8/2023 रोजी जाहीर कार्यक्रमात शरद कोळी शिवशेना उद्धव ठाकरे गट, नागेश कांबळे आर. पी. आय. करमाळा, पृथ्वीराज भैय्या पाटील, महेश दादा देवकाते राष्ट्रवादी कॉग्रेस, सचिन बोगवत इंदापूर राष्ट्रवादी, दीपक
ओव्हळ मा. नगराध्यक्ष करमाळा, लक्षिमन भोसले, कोंढार चिंचोलीचे विद्यमान सरपंच शरद भोसले, युवा नेते अभिजित साळुंके, चेतन गलांडे, राहुल गलांडे रयत क्रांती करमाळा अध्यक्ष सोमनाथ गलांडे, अनिल कांबळे व ग्रामस्थ यांच्या उपस्तितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.