करमाळा पतीनिधी

करमाळा शहर हद्दीतील देवीचा माळ रस्त्यालगत असलेली आयडीबीआय बँकेच्या एटीएम मध्ये पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे. सकाळी फिरण्यासाठी जात असलेल्या लोकांची भीतीही त्यांना वाटली नाही. एवढी धाडसी चोरी पहाटे झाल्यानंतर आता बँकेच्या एटीएम बाबत सर्वत्र सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अतिशय रहदारी असलेल्या या परिसरामध्ये पहाटे 10 मिनिटाच्या कालावधीत सदरची चोरीत हात साफ केला आहे. अचानक एक मोठी काळी गाडी बँकेसमोर उभा राहते. त्यातून तीन ते चार लोक उतरतात गॅस कटरच्या साह्याने एटीएम ला उभे फाडून त्यातून लाखो रुपयांची रक्कम घेऊन पसार होतात. दरम्यान बँकेच्या सीसीटीव्ही वर काळा रंग असलेला स्प्रे टाकून निघून जातात. या सर्व प्रकारात केवळ दहा मिनिटांचा कालावधी जातो.

यापूर्वीही असे प्रकार आणि गावांमध्ये घडलेले असताना करमाळ्यात मात्र कोणत्याही एटीएम मध्ये एकही सुरक्षारक्षक नसतो किंवा इतर कोणत्या प्रकारची सुरक्षा असावी असे नियोजन करण्यात आले नसते. नेमकी किती रक्कम गेली याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी यामध्ये 13 लाख 65 हजार रक्कम गेली असण्याची शक्यता आहे. घटनास्थळी करमाळा पोलीस ज्योतीराम गुंजवटे हे पथकासह पोहचले आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *