करमाळा प्रतिनिधी
आज 6 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने विविध ठिकाणी एकमेकाला फ्रेंडशिप चे धागे बांधत, सोशल मीडियावर पोस्ट करत, दूरध्वनी द्वारे संवाद साधून अनेकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. परंतु किल्ला विभाग येथील लोकमान्य टिळक बाल मंडळाच्या वतीने फ्रेंडशिप डे निमित्त वृक्ष लागवड करून अभिनव असा फ्रेंडशिप डे साजरा केला.
यावेळी बाल मंडळाच्या सर्व मुलांनी निसर्गाशी मैत्री करून निसर्गाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने एकत्रित येऊन फ्रेंडशिप डे दिवशी वृक्ष लागवड करून त्याला ट्री गार्ड लावून झाड जगविण्याची शपथ घेतली. यावेळी बालमंडळातील मुलांनी सांगितले की
आज-काल मोठ्या इमारती, रस्ते, कारखानदारी या सर्वांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून वृक्ष लागवडीकडे कोणाचाही कल दिसत नसल्याने आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन वृक्ष लागवड करीत त्याचे संवर्धन करून निसर्गाशी मैत्री
करण्याचा संकल्प केलेला आहे. या वृक्ष लागवडीच्या निमित्ताने पावसाचे प्रमाणही सुधारेल, त्याचबरोबर हवेतील ऑक्सिजन वाढेल, जमिनीची धूप कमी होईल या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही आज वृक्षारोपण करीत असल्याचे बालमंडळाच्या वतीने सांगण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी युवराज तोडकर, श्री पिंपळे, साहिल पठाण, समर्थ गायकवाड, कुणाल ननवरे, शोएब पठाण, प्रतिक शेरे, स्वराज गायकवाड, ओम कुऱ्हे, आराजित आवाड, आयुष आवाड, रूद्र कुऱ्हे, इ. बाल मंडळातील मुले उपस्थित होते.