नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील मेलेली जनावरे रोशेवाडी येथील घनकचरा प्रकल्पात टाकत असल्यामुळे तेथील नागरिकांना त्रास होत
आहे. याचा योग्य बंदोबस्त करमाळा नगर परिषदेने करावा अशी मागणी रोशेवाडी येथील सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
मेलेली डुकरे व इतर जनावरे तिथे टाकल्यामुळे भटकी कुत्री तिथे येतात व जनावरे खातात. ज्या दिवशी तिथे जनावरे नसतील त्यादिवशी रोशेवाडी गावातील शेळ्या गाई वासरू यांच्यावर हल्ला करीत आहे.
आज सकाळी सुनील कांबळे यांचे वासरू याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. या अगोदरही शेळ्या,म्हशीचे वासरू यांच्यावर ही
भटकी कुत्री हल्ला करत आहे. यामुळे पशुपालकांना संभाळणे अवघड झाले आहे. तरी याचा बंदोबस्त करमाळा नगर परिषदेने करावा अशी मागणी सरपंच व रोशेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.