पोथरे येथील दारू बंदीसाठी महिला आल्या पुढे
करमाळा प्रतिनिधी
दारूबंदी करून दाखवा 21 हजार रुपये देऊ असे आव्हान दारू विक्रेत्यांनी केल्यानंतर आता गावकरी मात्र एकत्र आल्याचे दिसून आले आहे. पोथरे येथील दारू विक्रेत्याने गावकऱ्यांना या संदर्भात आव्हान दिल्यानंतर सर्व गावकरी मिळून करमाळा
तहसील व पोलीस ठाण्याची संपर्क साधून दारूबंदी करावी अन्यथा आम्ही 15 ऑगस्ट ला आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
यापूर्वीही गावकऱ्यांनी बऱ्याचदा तक्रारी दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई ही झाली होती. परंतु पुन्हा सदरची दुकाने चालू होत असून उघडपणे दारू विक्री केली जाते यामुळे संसार तर उध्वस्त होतातच पण बस स्थानकावर सदरची दारू विक्री
होत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांसह महिलांना विद्यार्थिनींना व परिसरातील ग्रामस्थांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता.
यामुळे आज सर्वपक्षीय गावकरी यांनी करमाळा पोलीस ठाणे गाठले व सदरचा गाव, गावातील दारूबंदी करण्यासंदर्भात
करमाळा पोलिसांना निवेदन दिले आहे. यावेळी करमाळा पोलिसांनी योग्य ती कारवाई केली जाईल. दोन दिवसात सर्व दुकाने बंद केली जातील असे आश्वासन दिले आहे. सदर निवेदनावर 100 पेक्षा जास्त गावकऱ्यांच्या सह्या आहेत. यावेळी महिलाही बहुसंख्येने उपस्थित होत्या.