करमाळा प्रतिनिधी

सीना नदीवरील संगोबा बंधारा व पोटेगाव बंधारा गेल्या  तीस ते चाळीस वर्षा पूर्वी झालेला असून त्याचा फायदा पोथरे, निलज, पोटेगाव, बाळेवाडी, तरडगाव आदी भागाला होत आहे. कोळगाव धरनाचा फायदा खांबेवाडी, बोरगाव, करंजे, भालेवाडी,

दिलमेश्वर, वाघाची वाडी ही गावे वगळून खालील गावांना त्याचा फायदा होत आहे. ही गावे टेल ला असल्यामुळे !! इदंचं नसतीच, परम लभ्यते !! (हेही नाही अन तेही नाही) अशी अवस्था या गावांची झालेली आहे. याच नदीच्या भरवश्यावर बहुतेक

शेतकऱ्यांनी सरास बँक प्रकरणे करून पाईप लाईन केलेल्या आहेत. पण पाण्याची शास्वती नसल्याने एनवेळी पिके करपून जातात व शेतकरी जास्तच अडचणीत येतात. त्यामुळे वाघाचीवडी, बोरगाव, दिलमेश्वर, करंजे, भालेवाडी, खांबेवाडी आदी

गावांची आई जेऊ देईना व बाप भीक मागू देईना अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या साईडचा सर्वे करून त्वरित बंधारा मंजूर करावा अशी मागणी पूर्व भागाचे नेते व बोरगाव चे सरपंच विनय काका ननवरे यांनी केली आहे. वारंवार कोळगाव

धरणाचे पाणी खाली परांडा तालुक्यातील गावांना सोडले जाते. त्यामुळे थोडेसे पाणी उपयोगात येत होते, जास्तीत जास्त एक ते दोन महिनेच पाणी नदीत रहाते नंतर या भागात जनावराणा सुद्धा पिण्यास पाणी मिळत नाही. काही वर्षा पूर्वी स्व. दिगंबरावजी बागल यांनी देखील भालेवाडी बंधाऱ्याची मागणी केली होती.

या भागातील सर्व शेतकरी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना निवेदन देणार असल्याचे व या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे ननवरे यांनी सांगितले. यावेळी सरपंच श्रीराम भोगल, माजी सरपंच प्रमोद गायकवाड, भोज, भोई, दिलमेश्वर चे सरपंच मोरे, वाघाच्या वाडीचे सरपंच वाघ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *