
करमाळा प्रातिनिधी
रविवार दि.30 जुलै 2023 रोजी सामाजिक कार्यकर्ते रविदादा वळेकर यांचा वाढदिवस.
रविदादा वळेकर यांनी सुरुवातीला श्री कमलादेवी चे दर्शन घेतले इतर खर्चाला फाटा देत आपला वाढदिवस मूकबधिर मुलांसमवेत साजरा केला.

श्री देवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर विद्यालय येथे मुलांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
निंभोरे गावातील या विकासप्रिय नेतृत्वाचा, सामाजिक आणि आर्थिक विकासाला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या या समाजसेवकाचा वाढदिवस गावात वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षा, रांगोळी स्पर्धा, मैदानी खेळ, रक्तदान शिबिर, लसीकरण, आरोग्य शिबीर घेऊन साजरा केला जातो.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक वर्ग, कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
यावेळी रविदादा वळेकर समवेत देवीचा माळ येथील शेखर पवार, डॉ.शेंद्रे, समीर हलवाई, ईश्वर मस्के, नाथाभाऊ शिंदे, राज पठाण तसेच देवीचा माळ येथील सहकारी उपस्थित होते.

