
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत मानल्या जाणारे श्री कमलादेवी मंदिरामध्ये दर पौर्णिमेस सहवाद्य देवीचा छबिना मिरवणूक काढण्यात येत असून काही महिन्यांपासून श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून दर पौर्णिमेस

नामकिंत किर्तनकाराचे किर्तन आयोजन केले जाते. या अधिक श्रावण महिन्याच्या पौर्णिमेस ह.भ.प.सखूबाई शिंदे महाराज (कामोणेकर) यांच अतिशय सुश्राव्य किर्तन दिनांक १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीकमलादेवी मंदिरात होणार असून

भाविक भक्तांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्या असे आवाहन श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉ. प्रदीप कुमार जाधव पाटील, डॉ. महेंद्र नगरे, सुशील राठोड यांनी केले आहे. या

कार्यक्रमासाठी प्रशासन अधिकारी महादेव भोसले, व्यवस्थापक अशोक गाठे हे परिश्रम घेत आहेत. तर संयोजक श्री जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ श्रीदेवीचामाळ हे घेत आहे.
