करमाळा प्रतिनिधी

गुलाबराव बागल सर माजी मुख्याध्यापक व सचिव कर्मवीर आण्णासाहेब हायस्कूल ता. करमाळा  जि. सोलापूर यांचा आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य मार्फत सत्कार.

रविवार दिनांक:२३|०७| २०२३ रोजी साहित्य संमेलना निमित्त गुलाबराव बागल सर माजी मुख्याध्यापक व कर्मवीर आण्णासाहेब जगताप हायस्कूल, शिक्षण संस्थेचे सचिव यांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी किसन कांबळे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, अंगद देवकते रासप तालुकाध्यक्ष, बाळासाहेब टकले आदि मान्यवर उपस्थित होते.

गुलाबराव बागल सर हे मांगी या गावचे एक बौद्धीक व्यक्तीमत्व व शेतकरी सुपुत्र. ते १९७५ साली मुख्याध्यापक झाले होते. करमाळा तालुक्यात त्या वेळेस फक्त दोन हायस्कूल व आर्ट, काॅमर्स चे एक काॅलेज होते.  त्यावेळेस हा तालुका दुष्काळग्रस्त व अशिक्षित होता. अशा परिस्थितीत गुलाबराव बागल सरांनी शिक्षण व क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून हायस्कूल चे नाव जिल्हा स्तरावर व राज्यात उंचावन्याचे काम केले होते.

महाराष्ट्र राज्यात अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी झाले त्याचां पाया मजबूत करण्याचे काम बागल सर यांनी केले. माजी मंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागल यांना शून्यातून राजकीय द्रुष्टया उभे करन्याचे काम, विलासराव घुमरे सर व गुलाबराव बागल सर यांचे खूप मोठे योगदान आहेत.

स्वर्गीय दिगंबरजी बागल मामा हे जनसामान्यांचे प्रतिनिधी होते. मी आजपर्यंत करमाळा तालुक्यातील आमदार म्हणून फक्त मामांनाच भेटलेलो. बागल सरांनी अनेक क्षेत्रातील नेतृत्व निर्माण केले आहेत. म्हणून आम्ही त्यांचा घरी जाऊन सत्कार केला.

———————

प्राचार्य डाॅ अभिमन्यु टकले.

संस्थापक आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.

———————

या नंतर आम्ही ईजिंनियर प्रकाश कोळेकर यांना भेटलो करमाळा, कर्जत, जामखेड या तालुक्यात कोळेकर यांचा खूप मोठा जनसंपर्क आहे. शासकीय सेवे बरोबर त्यांचे सामाजिक कार्य खूप मोठे आहे.

बागल सर आणि कोळेकर साहेब यांच्याबरोबर शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात झालेले बदल व जुन्या आठवणींना उजाळा दिला. ऐतिहासिक पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे करमाळा येथे घ्यावे या साठी शिवाजी बंडगर सर सभापती बाजार समिती करमाळा, ईजिंनियर प्रकाश कोळेकर सर, अंगद देवकते, बाळासाहेब टकले, शंकर सुळ,जगन्नाथ सलगर यांनी मागणी केली होती. या साठी श्री गुलाबराव बागल सर व प्रकाश कोळेकर सर यांच्या बरोबर प्रथम चर्चा करण्यात आली.  या वयातही त्यांनी योग्य ते सहकार्य करन्याचे अश्वासन दिले. करमाळा तालुका ही माझी जन्म व गुरू भुमी. या भूमीचे आपण ॠण फेडू शकत नाही पण राज्यातील मान्यवरांसह यांचा सन्मान करून साहित्य संमेलनात यांचा सन्मान करू शकतो. या संमेलनाचे नाव आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य हे असले तरी या संमेलनात कधीही राजकारण, जात,धर्म, प्रांत, असा भेद करण्यात येत नाही. राज्य,राष्ट्रीय स्तरावरील सर्व उपेक्षित घटकाला स्टेज दिले जाते.करमाळा पासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चौंडी हे  पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आहे तेथे

आण्णासाहेब डांगे माजी मंत्री,संत साहित्याचे अभ्यासक यांची भेट झाली. मागील सर्व साहित्य संमेलनाची चर्चा केली. पाचवे साहित्य संमेलन चौंडी येथून जाहीर करावे असे ठरले. लवकरच अध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे सर सांगली,  सचिव ज्ञानेश्वर ढोमणे सर आमरावती, उपाध्यक्ष संभाजीराव सुळ लातूर, बाळासाहेब कर्णवर पाटील उपाध्यक्ष श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी, संजय शिंगाडे सर सांगोला टीम, सजगणे विठ्ठल सर सातारा, छगनशेठ पाटील ठाणे.उद्योजक, विष्णू माने नगरसेवक सांगली, क्रुष्णा बुरूंगुले सोलापूर, बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर, सोमनाथ कर्णवर पाटील एपीआय ठाणे, अर्जुन सलगर सोलापूर, डाॅ. यशपाल भिंगे नांदेड, संजय सोनवणी लेखक संशोधक पुणे, रामचंद्र खांडेकर दाजी मोहळ, चंद्रकांत हजारे प्रवकते अंबाजोगाई बीड व राज्यातील सर्व मान्यवरांसमवेत चर्चा करून साहित्य संमेलनाचे स्थळ व वेळ जाहीर केली जाईल. संमेलन चौंडी येथून जाहीर करण्यात येईल.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *