करमाळा आगार स्वयंसेवकांनी केले चकाचक
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर व करमाळा आगार यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा आगारांमध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. “जिथे हात फिरे
तिथे लक्ष्मी वसे ” या व्यक्तीप्रमाणे करमाळा आगारात राष्ट्रीय स्वयंसेवक राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर चे स्वयंसेवक उस्फूर्तपणे सहभागी होऊन सदर स्वच्छता अभियानात 2 टनापेक्षा अधिक कचरा गोळा करून संपूर्ण बस स्थानक स्वच्छ व सुंदर बनवले या स्तुत्य उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये एकूण निर्माण झाले. या उपक्रमात आगार प्रमुख होनराव यांनी सर्व
विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन त्यांच्या संकल्पनेतून स्वच्छ आणि सुंदर स्टॅन्ड ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी स्वतः सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानाची गाणी लावून प्रवाशांनाही स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आव्हान केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्या युनिटने सातत्याने स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन अनेक ठिकाणे व गावे स्वच्छ आणि सुंदर केली आहेत. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख, प्रा. सुजाता भोरे, आगार व्यवस्थापक विरेंद्र होनराव, स्थानक प्रमुख संजय कदम, वाहतूक निरीक्षक पंकज जाधव, वरिष्ठ लिपीक अरुण घोलप, लिपिक संजय माने यांनी परिश्रम घेतले.