कुर्डूवाडी प्रतिनिधी

बांधकाम कामगार कल्याणकारी संस्था माढा तालुक्याच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यात प्रथमच भव्य कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन संत

कुर्मदास साखर कारखान्याचे चेअरमन दादासाहेब साठे, उद्योजक निलेश धोका,  भोसरे जिल्हा परिषद मा. सदस्य आप्पासाहेब उबाळे, हमाल पंचायतीचे अध्यक्ष सुरेश बागल,  हिंदवी परिवाराचे प्रमुख संतोष कापरे,  संकेत उद्योग समूहाचे

सतीश कन्हेरे, शिवव्याख्याते हर्षल बागल,  इंजि. अजित पवार, शरदचंद्र भोसले,  बाळासाहेब बागल, महादेव फासे,  धनंजय परबत, नामदेव बोराटे,  नीलकंठ भुसनर, अक्षय खाडे, जीवन चव्हाण, अमरसिंह मोरे, बालाजी शिंदे  यांच्या उपस्थितीत

उद्घाटन गुरुवार रोजी येथे झाले. सदर बांधकाम कामगारांचे नोंदणी शिबिर हे इतिहासातील सर्वात मोठे शिबिर ठरले. सदरच्या शिबिरामध्ये 1455 कामगारांनी सहभाग घेत आपली नोंदणी केली. एकाच वेळी ही इतिहासातली सर्वात मोठी बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे.

बांधकाम कामगारांच्या परिवाराला फायदेशीर असणारे लाभ, विविध सरकारी योजना याबाबतीत उद्घाटन समारंभामध्ये आपल्या प्रास्ताविकामध्ये संतोष कापरे यांनी माहिती दिली. तर पंडित खारे, शरदचंद्र भोसले, धनंजय परबत यांनी मनोगत व्यक्त केले. सदरच्या कामगार नोंदणी शिबिरामध्ये संकेत मंगल कार्यालय हाउसफुल झाल्याचे दिसून आले. सुत्रसंचलन संतोष परबत यांनी केले तर आभार कल्याणकारी कामगार संस्थेचे अध्यक्ष संभाजी बागल यांनी मांडले.

शिबिर चालू असतानाच दुसऱ्या बाजूला कल्याणकारी संस्थेच्या वतीने संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले होते.  या शिबिरामध्ये एकूण 53 रक्तदात्यांनी रक्तदान देऊन सहभाग नोंदवला.

संजय मामा शिंदे वाढदिवसानिमित्त आयोजित बांधकाम कामगार नोंदणी शिबिर यशस्वी करण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष संभाजी बागल, उपाध्यक्ष नानासाहेब जगताप, सचिव दत्तात्रय जगताप, खजिनदार धनंजय माने, रोहिदास बागल, बालाजी चव्हाण, नाना बागल, उमेश गोसावी, संजय बागल, पांडू बागल, पप्पू गोरे, बंडू बागल, सचिन बागल, आकाश घाडगे, धनु डांगे, ज्ञानेश्वर शिंदे, अंकुश रणदिवे, महेश माने, तात्या चौरे, आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

चौकट

धोका परिवाराच्या वतीने बांधकाम कामगारांच्या यशस्वी पाल्यांना दहावी बारावीला पाच हजाराची शिष्यवृत्ती.

बांधकाम कामगार कल्याणकारी संस्थेकडे ज्या ज्या कामगारांनी नोंदणी केली अशा कामगारांच्या पाल्यांनी तालुक्यात दहावी आणि बारावीला जे सर्वोत्तम गुण मिळवतील अशा पाल्यांसाठी कुर्डूवाडीतील उद्योजक निलेश धोका यांच्या परिवाराच्या वतीने दहावी व बारावीला पाच हजार रुपये शिष्यवृत्ती पुढील वर्षीपासून देण्यात येईल, अशी घोषणा या शिबिरामध्ये शिवव्याख्याते हर्षल बागल यांनी केली.

चौकट

कामगारांना सरकारी योजनांचे लाभ मिळवून देणे,  सरकारच्या विविध योजनांसाठी कामगारांना साक्षर बनवणे, त्यांच्या नोंदणी करून घेणे हे आजपर्यंत कधीही कोणत्याही ठेकेदाराने, कोणत्याही संघटनेने केले नाही. परंतु बांधकाम कामगारांच्या इतिहासात सर्वात मोठी ही नोंदणी असून हे पुण्याचे काम बांधकाम कामगार कल्याणकारी संस्था करत आहे. दादासाहेब साठे चेअरमन – संत कुर्मदास साखर कारखाना

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *