मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर
करमाळा प्रतिनिधी
तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 27-7-2023 वार गुरुवार रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटलचे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप
प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून एकलव्य आश्रम शाळेचे सर्वेसर्वा व अध्यक्ष रामकृष्ण माने,शिवशेना तालुका अध्यक्ष संजय शिंदे , अर्बन बँकचे माजी संचालक रामदास जाधव,शिवशेनेचे संतोषजी गाणबोटे ,चंपकजी पारख ( इगतपुरी) , प्रकाश कुंकूलोळ (कोल्हार ), राष्ट्रवादीचे अरुणजी टांगडे,यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते. यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत
4425 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक, देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.या प्रसंगी बोलताना एकलव्य आश्रम शाळेचे रामकृष्ण माने यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम
सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. नुकतेच ऑपरेशन करून आलेले संतोष गाणबोटे यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे. ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले. तसेच अर्बन बँकेचे माजी संचालक रामदास जाधव यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना त्यांच्या कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले
.आजच्या शिबिरात 67 जणांची तपासणी करण्यात आली असून 21 रुग्ण ऑपरेशनसाठी बुद्रानी हॉस्पिटल पुणे येथे रवाना झाले.या शिबिरासाठी दिनेश मुथा, वैभव दोषी , गणेश बोरा,वर्धमान खाटेर,लाभेश कुंकूलोळ ( कोल्हार ), तनिष चोरडिया ( राहुरी ),गिरीश शहा, विजय बरीदे, सतीश शिंदे, संतोष भांड यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमच्या शेवटी संकेत खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.