
झरे फाटा ते झरेगाव, झरेगाव ते वीट, झरेगाव ते अंजनडोह रस्त्यासह रस्त्यांच्या दयनीय अवस्था
करमाळा प्रतिनिधी
झरे वीट, झरे अंजनडोह, झरे हजारवाडी, झरे बागल वस्ती. या भागातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून अनेक

ठिकाणी रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. तर अनेक रस्त्यावर खडी उघडी पडली असल्यामुळे ग्रामीण भागातून दळणवळण करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या भागातील नागरिकांची याच

रस्त्यावरून ये-जा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. खराब रस्ता असल्यामुळे बऱ्याच वेळा रस्त्यातच वाहनांचा खोळंबा होत आहे. तरी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

….
रस्ता दुरुस्ती संदर्भात आम्ही वारंवार मागणी करून देखील बांधकाम विभागाकडून लक्ष दिले जात नाही. तरी खराब झालेले रस्ते लक्ष देऊन लवकरात लवकर सुधारायची आवश्यकता आहे.-सोमनाथ जाधव

प्रहार तालुका उपाध्यक्ष करमाळा
