करमाळा पाण्या साठी तरमाळला क.न.प.ढिसाळ कारभाराचा शहरातील नागरिकांना बसतोय फटका – मांढरे-पाटील

करमाळा प्रतिनिधी

गेल्या तीन ते चार दिवसांपासून करमाळा शहराला पाणी पुरवठा नाही, “घागर उशाला कोरड घशाला” अशी अवस्था  करमाळा नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा शहरातील नागरिकांना बसतोय. फटका नागरीकांना पाणी बील मात्र एक महिन्याचे दिले

जाते पण पाणी मात्र पंधरा दिवस पण सुरळीत सुटत नाही आषाढी एकादशी, बकरी ईद ऐण सणाच्या तोंडावर शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही, हे लक्षात आल्यावर सावंत गटाने जोपासली सामाजिक बांधिलकी स्वखर्चाने शहरातील

नागरिकांना टँकर द्वारे केला. पाणी पुरवठा शहरातील नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत मात्र  या बाबती लोक प्रतिनिधी मात्र कोणच बोलायला तयार नाही. करमाळा नगरपालिका मुख्याधिकारी व्यक्ती गत कामासाठी रजा टाकून गेले आहेत. परंतु

ज्यांच्या कडे चार्ज आहे ते मात्र कुर्डुवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत. ते करमाळा मध्ये हजर नसतात. नागरीकांनी आपल्या व्यथा मांडायच्या कुणा कडे, निष्काळजी पणा मुळे  ट्रॅक्टर चोरीला गेला आहे. त्याचा तपास का लागत नाही? कुंपन

शेत खात आहे का? याची  सखोल चौकशी झाली पाहिजे. आपण लवकरच जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन करमाळा नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा शहरातील नागरिकांना कसा फटका बसतो आहे, कारभार रामभरोसे कसा चालू आहे, हे

त्यांच्या समोर मांडणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *