
करमाळा नगर परिषदेचा नियोजन शून्य कारभार चालु आहे – माजी नगरसेविका माने
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगर परिषदेचा नियोजन शून्य कारभार चालु आहे अशी माहिती माजी नगरसेविका राजश्री माने यांनी दिली आहे.

करमाळा नगर परिषदेचा आरोग्य विभागातील कचरा उचलण्याच्या कामात येणारा जुना ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे. घटना रविवारी मध्यरात्री घडल्याचे माहिती मिळत आहे. याप्रकरणी अध्याप कोणतीही तक्रार पोलीसात दिलेली नसली तरी ट्रॅक्टरचा शोध नगरपालिकेचे कर्मचारी घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ट्रॅक्टर जरी जुना असला तरी त्याच्यासोबत एक नवीन ट्रॉली चोरटे घेऊन गेले आहेत. काल रविवारी सर्व कर्मचारी स्वच्छतेची काम आटोपल्यानंतर माघारी जात असताना कार्यालय प्रमुखांच्या निवासस्थानासमोर लावलेले पाहून गेले होते. यावेळी या ठिकाणी तीन ट्रॅक्टर होते. पण रात्री त्यातील एक ट्रॅक्टर चोरीला गेला सकाळी कर्मचाऱ्यांनी पाहिला असता नगरपरिषद अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. यानंतर शोधाशोध सुरू झाली आहे करमाळा नगरपरिषद समोर सीसीटीव्ही बसवणे अत्यंत गरजेचे आहे त्या बरोबर वाँचमन असणे आवश्यक आहे तरी नगरपरिषद अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ हजर राहून कामकाज योग्य प्रकारे करण्यासाठी प्रयत्न करावे सध्या पालिकेचा पुर्ण कारभार प्रशासकीय अधिकारी पाहत आहे त्यांच्या वर अंकुश ठेवण्यासाठी कोणच नाही त्यामुळे अशा चोऱ्या होत आहे असेही अखेर माजी नगरसेविका राजश्री माने यांनी सांगितले आहे

…….
नगरपरिषद परिषद आवारात अशी घटना केंव्हाच झाली नाही तेथे सीसीटीव्ही आहे परंतु ट्रॅक्टर बुरुजाच्या कडेला असल्याने दिसत नाही सीसीटीव्ही बंद असेल तर चालू करून वाँचमन ठेवणार आहे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देणार आहोत – बालाजी लोंढे मुख्याधिकारी नगरपरिषद, करमाळा