मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी आजपासून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहीम राबवणार – भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी
मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी आज पासून मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा ते पंधरा हजार शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देणार आहोत, अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष गणेश दिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मांगी तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात करावा. या संदर्भात माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथील सिंचन भवन मध्ये झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून कुकडी प्रकल्पाच्या फेर जलनियोजनामध्ये मांगी तलावाचा समावेश करून तोही तलाव भरून घेण्याचे नियोजन करावे असं सूचना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांना दिले आहे.
करमाळा तालुक्यातील मांगी तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पाचा लाभ क्षेत्रातात करावा. या मागणीचे निवेदन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी गुरुवार दि. 1 जून रोजी दिले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना तुमचा पुण्याचा हेलपाटा वाया जाऊ देणार नाही, असे सांगितले व त्यानंतर लगेच शुक्रवार दि. 2
जून रोजी पुणे येथील सिंचन भवनांमध्ये झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीत मांगी तलावाचा समावेश कुकडी लाभक्षेत्रात करून तोही भरून घेण्याचे नियोजन करावे, हा विषय खा. निंबाळकर यांनी विषय सूचीमधील विषय क्र. 24 मध्ये घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून मांगी तलावाचा कुकडीच्या फेर जलनियोजनामध्ये समावेश करण्याच्या सूचना खा. निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
या बैठकीसाठी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, करमाळाचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोलाल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, करमाळा भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, काका सरडे तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास मंडळ महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता अभय काटकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित आहेत.
या पत्रकार परिषद प्रसंगी राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव , वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार,मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ झिंझाडे, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव शिंदे, पोथरेचे माजी सरपंच विष्णू रणदिवे, नितीन झिंझाडे, रायगावचे विलास बरडे, दासाबापु बरडे, मांगीचे किरण बागल, जयंत काळे- पाटील आदिजन उपस्थित होते.