पिडीत कुटुंबाला न्याय मिळावा – वाघमारे
करमाळा प्रतिनिधी
दि.3/6/2023 रोजी अक्षय भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बोंढार (हवेली) जिल्हा नांदेड ठीकाणी जयंती साजरी करण्यात आली. मनात राग धरून या कारणावरून गाव गुंडांनी जनावर ज्या पद्धतीने कापत असतात त्या प्रकारे निष्पाप अक्षय नव तरुणाचा खून केला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली तरी आज ही दलित मागासवर्गीय समाजावरील अन्याय अत्याचार होत आहे. सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याची इच्छा होत नाही असे दिसत आहे. सरकारने या प्रकरणी लक्षात घेऊन पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा. गृहमंत्री यांनी जाहीर आव्हान आहे की तुम्ही धर्म निरपेक्ष असल्यास दलित मागासवर्गीय समाजाला स्व रक्षणासाठी शस्त्र परवाना दिला पाहिजे.
डॉ आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने शहिद अक्षय भालेराव यांच्या हत्या प्रकरणी खालील मागण्या शासनाकडे करण्यात येत आहेत. तरी मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात.
* आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
* पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड याचं तत्काळ निलंबन करावे.
* आरोपीला आमदाराने आश्रय दिल्याचे समजत आहे, त्या आमदाराला सह आरोपी घोषीत करावे.
* दोन आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांना 24 तासात अटक करावी.
* 48 तासात ग्रहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी पीडितांची भेट घेतली पाहिजे.
* कुटुंबाला 50 लाखांची मदत व एका जणाला शासकीय नोकरी दिली पाहिजे.
*दलित मागासवर्गीय आदिवासी समाजाला शस्त्र परवाना देण्यात यावा.
अशी वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर माढा विभागाच्या वतीने जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे. यावेळी महाराष्ट्र मुख्यमंत्री. गृहमंत्री यांना gmail द्वारे दि.5/6/2023 निवेदन पाठवले आहे असे सांगितले.