माजी आमदार नारायण पाटील गटाला धक्का मलवडी गावच्या विद्यमान सरपंच बायडाबाई सातव यांच्यासह उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा प्रहार मध्ये प्रवेश.

करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात लोकनायक माजी मंत्री वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि तालुका संघटक नामदेव पालवे यांच्या अथक परिश्रमातून मलवडी गावचे विद्यमान सरपंच बायडाबाई सातव, उपसरपंच साहेबराव दुर्गुळे, पॅनल प्रमुख गणेश कोडलकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अनेक तरुण नेते मंडळी, महिला यांनी काल प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून गेल्या सात वर्षात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच सोलापूर शहरात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठे ताकतीने काम करत आहेत. रक्तदान रुग्णसेवा शेतकऱ्यांसाठी आंदोलने अपंगासाठी सेवाधर्म उराशी बाळगून सर्वजण अहोरात्र बच्चुभाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत गेल्या सात वर्षाच्या काळात जिल्ह्यातून अनेक लोकांनी प्रहार मध्ये प्रवेश केला असून अजून प्रहारच्या प्रवाहात सामील होण्याचा ओघ सुरूच असून अनेक ग्रामपंचायती सुद्धा प्रहारच्या संपर्कात असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

करमाळा तालुक्यात सध्याची जी परिस्थिती आहे, ऊस उत्पादक शेतकरी तसेच कारखान्यात काम करणारा कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत, रस्त्याची दुरावस्था झाली आहे, पाण्याच्या बाबतीत सुद्धा वाट पाहत तुझ्या भाव केला जात आहे, विद्यमान आमदारासह कोणत्याही नेत्याचे याकडे लक्ष नाही सूडाच्या राजकारणात करमाळा तालुक्यातील नेते मंडळी बुडाले असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात सेवेचा राजकारण समाजकारण करमाळा तालुक्यात रुजवण्याचे काम करणार असे दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर मलवडी व त्या भागाचे युवक नेते पॅनल प्रमुख गणेश कोंडलकर यांचा प्रहार प्रवेशानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्ष युवा आघाडी पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे, युवा आघाडी उपाध्यक्ष युनूस पठाण, तालुका संघटक नामदेव पालवे, तालुका संपर्कप्रमुख सागर पवार, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, माढा तालुका उपाध्यक्ष शेखर धोत्रे, त्यांच्यासह गावातील अनेक तरुण शेतकरी महिला वर्ग उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *