आमदार रणजितसिंह मोहीते पाटील यांचा वाढदिवस ऊम्मीद या संस्थेत वह्या व शालेयऊपयोगी वस्तु वाटप करुन साजरा.

करमाळा प्रतिनिधी

आज ऊम्मीद या HIV ग्रस्त बालकांचे संगोपन आणि ऊपचार करणाऱ्या संस्थेत छञपती संभाजी महाराज बहुऊद्देशीय संस्था कुर्डूवाडीच्या वतीने विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आवाहान केल्याप्रमाणे गरीब वंचीत अनाथ मुलांना शालेय ऊपयोगी वस्तु म्हणजे वही व पेन वाटप करुन तसेच त्यांना खाऊ वाटप करुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या वेळी माढा तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सुधिर भाऊ गाडेकर यांनी आमदार रणजितसिंह मोहीते पाटील साहेबांनी आवाहन केल्याप्रमाणे गरीब वंचीत शोषित अनाथ मुलांना वह्या व शालेयऊपयोगी सहित्य देऊन आमदार रणजितसिंह मोहीते पाटील साहेबांचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल छञपती बहुऊद्देशीय संस्थेचे अभय जाधव व त्यांचे मिञ परीवाराचे कौतुक करुन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी भाजपा अ.जा.ज.तालुका अध्यक्ष प्रा.पप्पु ननवरे सर, संभाजी ब्रिगेडचे सुहास दादा टोणपे, भाजपा तालुका ऊपाध्यक्ष सतिश चोपडे, OBC माढा तालुका भाजपा सरचिटणीस महेश बापु पाटणे, मनसे विधानसभा अध्यक्ष आकाश लांडे, भाजपा महिला आघाडी शहरअध्यक्षा प्रतिक्षाताई गोफणे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कडबाने, अ.जा.ज कुर्डुवाडी शहरअध्यक्ष बालाजी गायकवाड, कुंदन वजाळे ऊपस्थीत होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभय जाधव, अक्षय जाधव, शुभम सुर्यवंशी, अंकुश शिंदे, महेश नरुटे, शिवतेज मोहिते, दादा शिंदे यांचे सह छञपती संभाजी महाराज बहुऊद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *