
आठ दिवसात 3 लाख 75 हजार रुपयाची रुग्णांना मदत, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा शाखेचे कामगिरी, वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा दीपक पाटणे यांचे आव्हान
करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गेली आठ महिन्यात करमाळा तालुक्यातील रुग्णांना साठ लाखापर्यंत मदत झाली असून गेल्या आठवड्यात 3 लाख 75 हजार रुपये मदत झाल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे तालुका समन्वयक दीपक पाटणे व शहर समन्वयक शिवकुमार चिवटे, गणेश चव्हाण, नागेश चेंडगे यांनी दिली आहे.

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून मदती करिता आलेल्या रुग्णांचा ऑनलाइन अर्ज घेण्यापासून सर्व कामे व मार्गदर्शन या कार्यातून केले जाते, शिवाय महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत उपचार असलेल्या रुग्णालयातून रुग्णांना मोफत उपचार करून दिले जातात, पंतप्रधान वैद्यकीय मदत योजना सिद्धिविनायक गणपती मंदिर मदती योजना आधी ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.

वैद्यकीय कक्ष करमाळा कार्यालय प्रमुख रोहित वायभासे 9067171514 यांच्याशी सर्वांनी संपर्क साधावा असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
उपचारासाठी आर्थिक मदत मिळालेली रुग्णांची नावे व मदत मिळालेली रक्कम

राजवीर गणेश शिंदे सोलापूर-1 लक्ष रुपये
अर्जुन तानाजी पाटील हातकणंगले, कोल्हापूर-75 हजार
चंदन अशोक भिसे कर्जत, अहमदनगर -50 हजार रुपये
शंकर रामचंद्र आजबे माळशिरस, सोलापूर-50 हजार रुपये
राजू चंदन शेलार उल्हासनगर-50 हजार रुपये
कविता केशव केसकर मोहोळ, सोलापूर-50 हजार रुपये