
करमाळा नगरपरिषद मुली नं २ शाळेचे विद्यार्थीचे सत्कार सभारंभ संपन्न
करमाळा प्रतिनिधी
मुलींची शाळा नंबर दोन या शाळेतील इयत्ता पहिली तील तीन विद्यार्थी अर्पिता आनंद नाईकनवरे, ओवी अभिजीत पिसे, कशफ समीर सय्यद यांचा बुध्दीवंत परिक्षेत यश संपादन केल्यामुळे सदर विद्यार्थीनीचा शाळेच्या वतीने शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष असिफ जमादार यांचा शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

या शाळेतील यशस्वी विद्यार्थीनीचे करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, केंद्र समन्वयक दयानंद चौधरी, लिपीक शिवदास कोकाटे, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षीका लता उबाळे, शिक्षक सुनील जाधवर तसेच पालक वर्ग विद्यार्थीनी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जमादार म्हणाले की, या शाळेतील तीन विद्यार्थीनीने बुध्दीवंत परिक्षेत यश संपादन केले असुन काही विद्यार्थीनी यशा जवळ पोहचले होते त्यांनी यापुढे अधिक मेहनत करुन यश संपादन करावे अश्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेतील विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. आभार शाळेचे मुख्याध्यापक बलभीम शिंदे यांनी मानले.

