नामदेवराव जगताप यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध संस्थांच्या वतीने आदरांजली अर्पण : –

सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप यांना विविध पुण्यतिथी निमित विविध संस्थांमधे आदरांजली वाहण्यात आली . नामदेवराव जगताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जगताप गटाचे युवानेते माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप , माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप

यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली . कृषी उत्पन्न बाजार समिती , महात्मा गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय , सोलापूर जिल्हा मध्य सह बँक , खरेदी विक्री संघ आदी संस्थांमधे कै. जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रा .शिवाजी बंडगर , आदिनाथचे माजी उपाध्यक्ष प्रा.

शहाजीराव देशमुख , जिल्हा बँकेचे सिनियर बँक इन्स्पेक्टर अभयसिह आवटे , बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर , गटसचिवांचे समन्वयक सचिव बबनराव मेहेर , म. गांधी विद्यालयाचे प्राचार्य पी. ए. कापले आदी सह शेतकरी , व्यापारी विविध संस्थांमधील कर्मचारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *