
पंचशील बुद्ध विहार कमिटी मांगी यांच्यातर्फे तर्फे छत्रपती शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करत एक आदर्श उपक्रम राबविला
करमाळा प्रतिनिधी
मांगी येथील पंचशील बुद्ध विहार कमिटी यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती साजरी करत असताना आज रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी मांगी येथील पंचशील बुद्ध विहार कमिटी मध्ये जयंती साजरी करत असताना छत्रपती शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्यात आली. या उपक्रमामध्ये तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंचशील बुद्ध विहार कमिटीचे विशेष अभिनंदन करत

कौतुक केले. यावेळी प्रमुख पाहुणे पश्चिम महाराष्ट्राचे आरपीआय अध्यक्ष आयु नागेश जी कांबळे होते. यांच्यासह मांगीतील सामाजिक कार्यकर्ते व ग्रा.पं. सदस्य सुजित तात्या बागल, शिवसेना ठाकरे गटाचे आदेश बागल, दलित सेनेचे आयु लक्ष्मण भोसले, ज्येष्ठ विचारवंत तसेच करमाळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष आयु दीपक ओहोळ, सामाजिक कार्यकर्ते संभाजी राजे बागल, शेतकरी संघटनेचे अजय बागल, निखिल बागल, पुणे येथील उद्योजक सुरेश भैय्या नरसाळे,

नाना बनसोडे सर, ग्रा.पं. सदस्य स्नेहल अवचर, मातंग एकता आंदोलनाचे रवींद्र शिंदे, रेवनाथ शिंदे, वडार समाजाचे अध्यक्ष ननावरे, वाल्मीक कोळी संघटनेचे राहुल जाधव यांच्यासह विविध जाती-धर्माचे लोक उपस्थित होते. प्रथम पंचशील बुद्ध मध्ये बुद्ध वंदना घेण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी स्टेज वरती विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून

कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा-पगड जातीच्या आरक्षणासाठी दिलेले योगदान किती महत्त्वाचे आहे याची माहिती देण्यात आली. तसेच बहुजनांनी एकत्र येणे हे आजच्या काळाची गरज आहे, असे विचार व्यक्त केले. यावेळी मांगी येथील ग्रामस्थ सह घुमट वस्तीवरील ग्रामस्थ व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा जयंती उत्सव पार पाडण्यासाठी पंचशील बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष आदिनाथ चव्हाण, उपाध्यक्ष आयु नवनाथ अवचर, खजिनदार शहाजी अवचर, सेक्रेटरी महिंद्रा अवचर, सचिव अभिमान अवचर, मार्गदर्शक प्रवीण अवचर, रवींद्र शिंदे, राजेंद्र चव्हाण, राहुल अवचर, अंकुश अवचर, भीमराव अवचर, प्रेम चव्हाण, शुभम अवचर, अक्षय अवचर, हर्षद अवचर, किरण अवचर, नितीन शिंदे, सागर अवचर, संतोष बनसोडे, अजय अवचर त्यांचे सह मित्र परिवारांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी करमाळा पोलीस स्टेशनचे कोदरे व मांगी येथील पोलीस पाटील आकाश शिंदे यांचा ही सत्कार करण्यात आला.