
करमाळा प्रतिनिधी
वाशिंबे येथे यात्रे निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद झोळ यांनी दिली आहे.
गुरुवार दि. ६ एप्रिल 2023 (चैत्र पौर्णिमा) – पहाटे 12 ते 5 नाथांचरणी दंडवत, सकाळी 6 वाजता महाआरती, सकाळी 7 ते 9 अभिषेक, दुपारी 12:30 वाजता मानाच्या कावडीचे पुजन व नृत्य सोहळा, सायंकाळी 8:30 वाजता महाआरती व छबीना मिरवणूक (नाथांच्या छबिण्याचे सोनाराच्या वट्ट्यावरून मंदिराकडे प्रस्थान), पहाटे 2 ते 3:30 मंदिर परिसरात छबिना आरती (वेड्याची महाआरती).

शुक्रवार दि. 7 एप्रिल 2023 – सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत छबीना मिरवणूक, दुपारी ठीक 12 वाजता श्रींची सोनाराच्या वट्ट्यावर महाआरती, सायंकाळी 4 वाजता भव्य कुस्त्यांचा आखाडा.
असे उपाध्यक्ष झोळ यांनी सांगितले.


