
करमाळ्यात घाणीचे साम्राज्य काँग्रेस आक्रमक, उपाययोजना न झाल्यास नगरपालिकेसमोर गाळ फेकणार – शहराध्यक्ष जगताप
करमाळा प्रतिनिधी
येथील नगरपालिका प्रशासन दूर्लक्ष करत असल्याने करमाळा शहराची अवस्था बकाल झाली असून पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरपालिकेसमोर गाळ फेकण्यात येईल असे निवेदन काँग्रेस चे युवक शहराध्यक्ष सूजय जगताप यांनी नगरपालीका कार्यालयात मुख्याधिकारी यांना दिले आहे. त्याच्या प्रती पोलिस निरिक्षक व तहसिलदार यांना दिले आहे.

निवेदनात करमाळा शहरास कोणी वाली राहीला नसून जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य असून, गटारी तूंबल्या आहेत, कचरा रस्त्यावर येत आहे, घाणीचे ढिग जागोजागी दिसून येतायत त्यामूळे सर्वत्र मच्छर व रोगराई पसरण्यास सुरूवात झाली आहे.
काही ठिकाण चे पेव्हिंग ब्लाॅक उचकटून पडले आहेत. त्यात पाणी साचते त्यामुळे चालताही येत नाही.

यावर पंधरा दिवसांच्या आत उपाययोजना न झाल्यास शहरातील घाण नगरपालिकेसमोर आणून टाकली जाईल व यांस करमाळा नगरपालिका जबाबदार राहील असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
