घारगाव येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर व डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले.

करमाळा प्रतिनिधी

दि. १/४/२०२३ रोजी श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि श्री कमला भवानी ब्लड सेंटर च्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आणि बुधरानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांच्या सहकार्याने डोळे तपासणी शिबिर देखील भरवण्यात आले होते. त्यावेळी गावातील 60 ते 70 लोकांनी डोळे तपासून घेतले.  त्या शिबिरामध्ये एकूण 24

जणांनी रक्तदान केले. घारगाव ग्रामस्थांच्या वतीने व श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आणि यात्रा कमिटीच्या वतीने आणि श्री कमला भवानी ब्लड सेंटर च्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनेक जणांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे घारगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने व

संयोजक आणि यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यावेळी गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ भक्त उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *