जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी येथे शिक्षण परिषद संपन्न
माहे मार्च 2023 ची करंजे केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेवाडी येथे संपन्न झाली.शिक्षण परिषदेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुशिल नरूटे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजन करून झाले.अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री बापू भगत होते.शिक्षण परिषद चे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री पोपट पाटील यांनी केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री आदिनाथ शिंदे, श्री तुषार गरड उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरूवातीला माजी केंद्रप्रमुख
कै.शिवाजी जगताप यांना सर्व शिक्षकांनी श्रद्धांजली अर्पण केली.शाळेच्या प्रगतीचा, लोकसहभाग,व शाळेतील उपक्रमांविषयी माहीती दिली. तसेच देशोदेशीचे शिक्षण या पुस्तकाचे परिक्षण उपस्थितांना सांगितले. इ .4थी मधील विद्यार्थ्यींनी संपूर्ण परिपाठ घेतला. उपस्थित सर्व शिक्षक वृंदांचे स्वागत गुलाब पुष्प देवून करण्यात आले. राज्यस्तरीय संपादणूक पातळी
सर्वेक्षणाविषयी श्री प्रसाद कुलकर्णी व श्री गोकुळ कोकाटे यांनी मार्गदर्शन केले.तर FLN विषयी मार्गदर्शन श्री अशोक चव्हाण व नागनाथ माने यांनी केले.CCE मुल्यमापन व नोंदी याविषयी श्री शिवलाल शिंदे व संजय गर्जे यांनी मार्गदर्शन केले.केंद्रप्रमुख बापू भगत यांनी परिपत्रक , शगुन पोर्टल,शाळा सिध्दी,U dise , संकलित मूल्यमापन याविषयी माहिती देवून शाळा निहाय
आढावा घेण्यात आला.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुशिल नरूटे यांनी ग्रामपंचायत व लोकसहभागातून शाळेतल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
सहशिक्षिका श्रीमती गीता गायकवाड यांनी उपस्थित शिक्षकांचे आभार मानले.