कै. शिवाजी विष्णुपंत जगताप यांचे निधन
कै. शिवाजी विष्णुपंत जगताप राहणार पांडे यांचे तीव्र हृदयविकाराने दि. २८-३-२०२३ वार – मंगळवार रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले प्रौढ साक्षरता वर्ग ते केंद्रप्रमुख अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या त्यांच्या अंत्यविधीला पांडे पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले एक मुलगी, दोन सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. त्यांचा दशविधी क्रिया ही दि.६-४-२०२३ वार गुरुवार रोजी श्री क्षेत्र संगमेश्वर संगोबा येथे सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे.