प्रा. अर्जूनराव सरक यांच्या सेवापुर्ती समारंभा निमित्त 31मार्च रोजी जेऊर येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीचे प्रमुख प्रा. डाॅ संजय चौधरी यांनी दिली.
भारत हायस्कूल ज्युनिअर काॅलेजच्या व्यावसाय अभ्यासक्रम विभागाचे प्रमुख प्रा. अर्जूनराव सरक हे दि. 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होत असून भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या व माजी आमदार नारायण (आबा) पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना प्रा. चौधरी यांनी सांगितले की, शुक्रवार दि. 31 मार्च रोजी भारत हायस्कूल समोरील कर्मयोगी गोविंदबापू पाटील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले असून सकाळी दहा वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत व करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तसेच जि. प. व प. स. समितीमधील आजी माजी पदाधिकारी आणि सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील विविध शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी तसेच शिक्षक यांनाही आवर्जून निमंत्रण दिले
गेले आहे. या समारंभात लेखक व विचारवंत प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांचे ‘ग्रामीण शिक्षण व्यवस्थेपुढील आव्हाने व संधी या महत्वपूर्ण विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी प्रा. अर्जून सरक यांची ग्रंथतूला करण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान प्रा. डाॅ. संजय चौधरी यांनी केले. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया,
पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर, भारत महाविद्यालय प्राचार्य डॉ. अनंतराव शिंगाडे, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य केशव दहिभाते, प्रायमरीचे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे, पांडुरंग वाघमारे सर, भीमराव सरक सर,राजेश शिंदे सर आदि उपस्थित होते.