आ. संजयमामा शिंदे यांचा गाव भेट दौरा कोर्टी साठी फलदायी – सुभाष अभंग

प्रतिनिधी

करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजयमामा शिंदे यांनी 2023 वर्षाच्या प्रारंभीच संपूर्ण करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील गावे आणि वाडीवस्ती वरती गाव भेट दौऱ्याच्या आयोजन केलेले होते. सदर गावभेट दौरा कोर्टी गावासाठी विशेष महत्त्वाचा ठरल्याची माहिती कोर्टी चे माजी उपसरपंच सुभाष अभंग यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिलेले होते. त्यावेळेस रस्त्याच्या मागणीसाठी कुस्करवाडीने निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला होता. दुरावस्था असलेल्या या रस्त्यावरून आमदार संजय मामा शिंदे कुस्करवाडीच्या भेटीसाठी आले. त्यावेळेस रस्त्याची दुरावस्था पाहून त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या 30 54 हेड मधून सदर रस्त्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

कोर्टी हे गाव 12 वाडी वस्तीने मिळून बनलेले आहे. यापैकीच गोरेवाडीला भेट दिली असता तेथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था पाहून 1 नवीन वर्ग खोली बांधकामासाठी 9 लाख 98 हजार रुपयांचा निधी आमदार संजय मामा शिंदे यांनी मंजूर केला. एकूणच आमदार संजय मामा शिंदे यांचा गाव भेट दौरा कोर्टी गावासाठी फलदायी ठरला असून कुस्करवाडी आणि गोरेवाडी या वाडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न सुटण्यास मदत झालेली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *