मी वडार महाराष्ट्राचा तालुका अध्यक्ष सागर भाऊ पवार यांच्या प्रयत्नामुळे दवाखान्याचे ३७ हजार बिल केले कमी तालुक्यामध्ये होत आहे कौतुक
करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
करमाळा तालुक्यातील केम येथील मी वडार महाराष्ट्राचा तालुकाध्यक्ष सागर भाऊ पवार यांच्या प्रयत्नांमुळे दवाखान्याचे बिल 50 हजार रुपये झाले असताना सागर भाऊ पवार यांच्या प्रयत्नांमुळे ते बिल कमी करून फक्त 13 हजार रुपये एवढे बिल मुलाच्या आई वडिलांना भरावे लागले आहे जवळपास 37 हजार रुपयांचे बिल सागर भाऊ पवार यांनी कमी केले असल्याने त्यांचे कौतुक तालुक्यांमधून होत आहे
नागेश रेपानवाड रा. कासराळी ता. बिलोली जि. नांदेड वय वर्ष 12 या मुलाला दवाखान्याचा खर्च 50 हजार रुपये सांगितला होता तो खर्च सागर भाऊ पवार यांच्या प्रयत्नांमुळे 37 हजार रुपये कमी करून फक्त 13 हजार रुपये मुलाच्या आई-वडिलांना भरावी लागले आहेत. सागर भाऊ पवार हे केम नव्हे तर नांदेड मध्ये देखील त्यांच्या कामाची ख्याती आहे. गोरगरीब नागरिकांसाठी सतत प्रयत्न करत राहणारा नेता म्हणून सागर भाऊ पवार यांना ओळखले जाते. तालुक्यामधील जनतेने कोणत्याही अडचणीसाठी सागर भाऊंना हाक दिली तर त्यांच्या हाकेला ओ देण्यासाठी हे सागर भाऊंचे काम आहे. त्यामुळे केमनगरीसह तालुक्यामध्ये सागर भाऊ पवार यांचे कौतुक होत आहे.