उत्तरेश्वर महाराज यांच्या मंदिरासाठी दोन कोटी निधी मंजूर – अजितदादा तळेकर
केम प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे
केम येथील जागृत देवस्थान श्री उत्तरेश्वर महाराज यांच्या मंदिरासाठी दोन कोटी निधी मंजूर रणजितसिंह मोहिते पाटील, नारायण आबा पाटील, अनिरुद्ध कांबळे यांच्या प्रयत्नातून निधी मिळाला आहे असे अजित दादा तळेकर यांनी सांगितले आहे.
करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर महाराज यांच्या मंदिरासाठी दोन कोटी रुपये निधी केम गावचे माजी सरपंच अजितदादा तळेकर यांनी आणलेला आहे. त्यामुळे केम गावामध्ये आनंदाची आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजित दादांनी केम गावच्या विकासासाठी भरपूर असे प्रयत्न केले आहेत. रस्ते, लाईट, पाणी, आरोग्यसेवा इत्यादींसाठी ही त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव तालुक्यामध्ये आहे. आता त्यांनी केम
गावचे जागृत देवस्थान श्री उत्तरेश्वर महाराज मंदिरासाठी दोन कोटी निधी मंजूर करून आणल्यामुळे त्यांचे कौतुक केमनगरीसह तालुक्यांमध्ये ही होत आहे. चांगले काम करण्याचा हा त्यांचा नारा आहे चांगल्या कामासाठी सातत्याने प्रयत्न करून कशाप्रकारे केम गावचा विकास करता येईल यासाठी त्यांची सततची धडपड बघायला मिळत आहे. भक्तनिवास (पुरुष) बांधकाम करणे, भक्तनिवास (महिला) बांधकाम करणे, श्री उत्तरेश्वर महाराज मंदिरासमोर सिमेंट काँक्रेट रस्ता करणे,
पेव्हिंग ब्लॉक बसवणे, मंदिर क्षेत्रास रिटेनिंग ब्लॉक बसवणे, मंदिर परिसरातील वाहनतळ सिमेंट काँक्रेट करणे, मंदिर परिसरातील स्ट्रीट लाईट बसवणे इत्यादी कामे करण्यासाठी दोन कोटी निधी मंजूर करून आणलेला आहे असे अजित दादा तळेकर यांनी सांगितले आहे. येथून पुढेही केम गावासाठी जेवढे शक्य आहे तेवढे सहकार्य करून केम गावासाठी निधी मंजूर करून विकास कामे केली जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.