सुयश गुरुकुल मधील आठवणीतील केशवजी शिंदे” सरांचे पत्र – आकाश लुणिया

जेआरडी माझा

२०१० साली २७ मुले व ४ मुली असे फक्त ३१ मुलांची बॅच आम्ही “सुयश गुरुकुलमधून” इयत्ता १०वी पास होऊन बाहेर पडलो. आज बॅचमधील सर्व मित्र व मैत्रिणी त्यांच्या प्रस्थापित क्षेत्रामध्ये निपुण आहेत.

सत्य सांगितलं तर अतिशयुक्ती वाटेल असे करियर सर्वानी घडविले आहेत.  मर्चंट नेव्ही, डॉक्टर, पत्रकार, इंजिनियर, लेखक, ऍथलेट्स, फुटबॉल, क्रिकेट, रिन्यूएबल सोर्सेस, कृषी व उद्योग, आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये वैज्ञानिक व शिक्षक या क्षेत्रामध्ये सर्वजण तपस्या करत आहेत. आम्हा सर्वांच्या जडणघडणीमध्ये आमचे मुख्याध्यापक “केशवजी शिंदे” सर यांचा मोलाचा वाटा आहे. २००९ साली सरांनी आमच्या पालकांना लिहलेले पत्र आज सादर करत आहे. सरांच्या अशा अनेक प्रयोगांमुळे आमच्या शालेय शिक्षणासोबतच सामाजिक जीवन देखील समृद्ध झाले.

आज करमाळा तालुका, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असून देखील, येथील मुख्याधापक, शिक्षक, गटविकास अधिकारी व समाजसेवक बंधू व भगिनींनी प्रचंड मेहनत व सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करून शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवत, यशस्वी देखील होत आहेत. आपल्या सभोवतालचं हे शैक्षणिक क्षेत्रातील उल्हासित वातावरण पाहता, हे पत्र सादर करण्याचा मोह मला आवरला नाही.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *