देवळाली येथे बालविवाह संदर्भात निर्भया पथकाचे मार्गदर्शन
ग्रामपंचायत कार्यालय देवळाली खडकेवाडी येथे डी. वाय. एस. पी. डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाची टीम पी.एस.आय. प्रवीण साने, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी पवार, हेमंत पाडुळे, शिवदास गरजे, गणेश गायकवाड यांच्या उपस्थितीत बालविवाह प्रतिबंधक या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत साने साहेबांनी मुलींचे वय किमान 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे असले पाहिजेत, योग्य वयाच्या आत लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच त्या
मुला-मुलीस देखील आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. असे सांगितले यावेळी साने साहेब यांनी ग्रामस्थांना सांगितले की, जर कोणी आपल्या आसपास किंवा आपल्या गावात बालविवाह करत असतील तर पोलीस स्टेशनची संपर्क करा तसेच जो कोणी माहिती देईल त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगितले साने साहेबांनी चांगले मार्गदर्शन केल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
या सभेमध्ये देवळाली गावचे प्राथमिक शाळेचे शिक्षक बाळासाहेब गोरे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी सांगितले की, जवळ पास 30 वर्षे सेवा कालखंडात देवळाली येथे 1000 लग्न लावले असतील. त्यामध्ये कदाचित ५% बालविवाह देखील झाले असतील परंतु, यापुढे देवळाली गावात माझे या गावाशी नाते आहे तोपर्यंत मी एकही बाल विवाह होऊ देणार नाही अशी
शपथ घेतली आणि मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच देवळाली चे सरपंच यांनी सांगितले की, आम्ही ग्रामसभेमध्ये सुद्धा बालविवाह रोकण्या संदर्भात ठराव घेतलेला आहे. तसेच या पुढे बालविवाह होऊ न देण्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक व देवळाली ग्रामस्थ कटिबद्ध आहोत असे सांगितले. या सभेस देवळाली गावचे सरपंच गहिनीनाथ गणेशकर, उपसरपंच धनंजय शिंदे, माजी सरपंच आशिष गायकवाड, चेअरमन रामभाऊ रायकर, पैलवान नागनाथ गायकवाड, माजी ग्रा.पं.सदस्य बंडू काका शेळके, ग्रा.पं.सदस्य पोपट बोराडे, प्रकाश कानगुडे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व देवळाली खडकेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व या कार्यक्रमाचे आभार उपसरपंच धनंजय शिंदे यांनी मांडले.