विहाळ तलावातील कुकडीच्या पाण्याचे ग्रामस्थांकडून पूजन

प्रतिनिधी

           कुकडी प्रकल्प डावा कालवा अंतर्गत पोंधवडी चारीचे काम निधीअभावी 2009 पासून रखडलेले होते. सदर चारीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून विहाळ, कोर्टी, गोरेवाडी, हुलगेवाडी, कुस्करवाडी राजुरी, वीट, अंजनडोह या गावातील नागरिक सातत्याने लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत होते. कॅनॉलचे कामे रखडल्यामुळे कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये  कुकडीचे पाणी दाखल झालेले नव्हते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडी प्रकल्प अंतर्गत येणारी पोंधवडी  या चारीचे काम पूर्ण करून या चारीवरील गावांना आपण पाणी देऊ असे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्ती आ. संजयमामा शिंदे यांच्याकडून झाल्यामुळे विहाळ तलावात प्रथमच कुकडीचे पाणी दाखल झाले.

          विहाळ तलावातील या पाण्याचे पूजन लोचना कारभारी येळे ग्रा. प. सदस्य,  उषा बाळू येळे,  नंदाबाई बबन येळे, सारीका रामदास येळे,  सुशीला बाई नवनाथ येळे या महिलांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुभाष अभंग, मोहन तात्या मारकड सरपंच, प्रदीप भाऊ हाके ग्रा. प. सदस्य, शिवाजी नाळे ग्रा. प. सदस्य, बबन येळे ग्रा. प. सदस्य, कारभारी येळे मा. ग्रा. प. सदस्य, बिन्टू येळे, धनंजय नाळे सर, सोमा नाळे,  मंगेश येळे,  बाळू येळे,  राजेश येळे, जालीधंर नाळे,  अनिल नाळे,  अजित येळे, सुजीत येळे,  प्रदीप येळे, हनूमंत येळे, सुरज ढेरे आदी उपस्थित होते.

           चौकट –

कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी शाखा कालवा – हुलगेवाडी चारीचा शुभारंभ गतवर्षी  आ. संजयमामा शिंदे यांच्या शुभ हस्ते व मा.आ.जयवंतराव जगताप यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला होता. मागील 3 पंचवार्षिक योजनेत या कामासाठी पुरेसा निधी  मिळत नव्हता त्यामुळे हे काम रखडले होते. संजयमामा शिंदे आमदार झाल्यानंतर शासन दरबारी सतत पाठपुरावा करून 9 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर करून काम सुरू केले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *