संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ लवकरच कार्यान्वित 

 नुकत्याच झालेल्या घडामोडीत संत सेनाजी महाराज केश शिल्पी  महामंडळ संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्र केश शिल्पी मंडळ चे मा.अध्यक्ष सुधीर (बंडूभाऊ) राऊत यांना बोलावून या संदर्भात चर्चा केली असून, लवकरच या बाबत कार्यवाही पूर्ण होऊन नाभिक समाजाची मागणी पूर्ण करीत हा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटण्याचे संकेत दिलेत. अर्थसंकल्पात केलेल्या 50 कोटी तरतूद व संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ पुनरस्थापित केल्याबद्दल प्रदेश कार्याध्यक्ष बंडूभाऊ राऊत यांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळ व समस्त नाभिक समाजाचे वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे पुन्हा आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *