कुर्डूवाडी प्रतिनिधी

नाभिक समाज कुर्डूवाडी यांच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा २०२६ मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी श्री संत सेना महाराज मंदिर, श्री नागनाथ महाराज मंदिर, भोरे वस्ती समोर, भोसरे (कुर्डूवाडी) येथे भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता श्री संत सेना महाराज यांच्या अभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भजनाच्या माध्यमातून संत सेना महाराजांच्या विचारांचे व कार्याचे स्मरण करण्यात आले.

दुपारी १२ वाजता श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यानंतर दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कुर्डूवाडी शहर व परिसरातील नाभिक समाज बांधव, भगिनी तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेच दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला.

या संपूर्ण सोहळ्यामुळे कुर्डूवाडी परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाभिक समाज कुर्डूवाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधिर भाऊ गाडेकर, रामभाऊ राऊत, पोपट गाडेकर, ईश्वर गाडेकर, विनोद गायकवाड, अजय काशीद , वैजनाथ राऊत यांच्या समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *