करमाळा प्रतिनिधी

करमाळा पोलीस ठाणे हद्दीत सन 2024, 2025 आणि 2026 मध्ये गहाळ झालेल्या एकूण 28 मोबाईलचा शोध घेण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. या मोबाईलची अंदाजे किंमत 6 लाख 30 हजार रुपये असून, तांत्रिक विश्लेषणाद्वारे व CEIR पोर्टलच्या मदतीने मोबाईलचा शोध घेऊन ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.

करमाळा पोलीस ठाण्याने सायबर पोलिस ठाण्याच्या मदतीने गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेतला. त्यामध्ये एकूण 28 मोबाईल मिळून आले असून ते 28 तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक  विजय कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्हि.एस. मंडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस कर्मचारी पो.कॉ. स्वप्नील शेरखाने, पो.कॉ. प्रकाश जगदाळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. सोनवणे यांनी ही कामगिरी केली. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

मोबाईलमध्ये वैयक्तिक माहिती, फोटो, बँकिंग व महत्त्वाची कागदपत्रे असतात. त्यामुळे मोबाईल वापरताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

  • अनोळखी व्यक्तीला OTP, PIN, पासवर्ड किंवा UPI PIN सांगू नका.
  • मोबाईलला Screen Lock/Password अवश्य ठेवा.
  • अनोळखी लिंक, APK किंवा संशयास्पद ॲप डाउनलोड करू नका.
  • बँकिंगची माहिती कोणालाही फोनवरून देऊ नका.
  • सार्वजनिक Wi-Fi वापरताना संवेदनशील व्यवहार टाळा.
  • मोबाईल हरवल्यास तात्काळ SIM व बँकिंग सेवा सुरक्षित करा.

“सावध राहा, सुरक्षित राहा—तुमचा मोबाईल आणि तुमची माहिती दोन्ही जपा!”

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *