
करमाळा प्रतिनिधी
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल, रोशेवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी होत उपस्थितांची मने जिंकली.
दि. 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी खूप सुंदर राधा कृष्ण वेशभूषेत सादरीकरण केले. या नंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला. गोविंद आला रे… या जयघोषात अत्यंत उत्साहात दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांनी नृत्य करत कार्यक्रम साजरा केला. तसेच 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेचा परिसर भक्ती, आनंद आणि उत्साहाने भारावून गेला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.