वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करमाळा शहरातील घाणीच्या साम्राज्य बाबत नगर परिषेस निवेदन
करमाळा प्रतिनिधी
वंचित बहुजन युवा आघाडी करमाळा शहरात नगर परिषद परिसरात विविध ठिकाणी वॉर्ड क्रमांक 1 ते 6 भीम नगर,साठे नगर, कानाड गल्ली,सिध्दार्थ नगर, मौलाली नगर, फंड गल्ली,संगम चौक ते दत्त मंदिर परिसरात कचरा ढीगभर आहे. रस्त्यावर खड्डे रस्ते खराब. कमी दाबाने पाणीपुरवठा. शहरातील चोहोबाजूंनी अतिक्रमणे झाली आहे. चोहोबाजूंनी व्यापारी पेठ येथील रस्त्यावर वाहतूक कोंडी ट्राफिक जॅम होत आहे.स्वच्छाता गृह घाण काही ठिकाणी तर स्वच्छाता गृह नाहीत. भीम

नगर येथे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. डुकरे जनावरे भीम नगर मोकाट जनावरे भाजी मंडई घाणीचे साम्राज्य कमी दाबाने पाणीपुरवठा.गायकवाड चौका ते खंदक रोडवर डुकरे डुकरे पिसाळ आणला आहे नागरिकांना या सर्व गोष्टींचा राग येतो. तक्रारही करण्यात आली अधिकारी वर्ग लक्ष देत नाही. याहीपेक्षा मौलाली नगर येथील नागरिकांना नरक यातना भोगावी लागती या ठिकाणी देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली तरी या ठिकाणी नगर परिषद कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध करून दिली नाही या ठिकाणी आया बहिणी जेऊर करमाळा रोडवर लगत अब्रू लपवत रात्री अपरात्री विष्ठा करतात. मागील

बाजूस राहणारे लोकांना काय ते यांच्या पेक्षा वाईट आहे. झाडा झुडपात रात्री अपरात्री विष्ठा करण्यासाठी जातात. अनेक वेळा या ठिकाणी सर्प दंश जंगली जनावरे हल्ला करून त्यांना विजा करतातही सर्प दंशाने काही नि जीव गमावले आहेत. त्यामुळे येत्या 8 दिवसात या सर्व समस्या निवारण न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष.साहेबराव वाघमारे उपोषणाला बसणार असे निवेदनात म्हटले आहे .यावेळी करमाळा शहर कार्यकर्ते .हणमंत फलफले,अक्षय गुंजाळ, रोहीत लष्कर, लालचंद सावंत, अनिल देवकर, अक्षय माने,सादीक सय्यद, सलमान मनेरी,गणेश कांबळे,प्रमोद राखुंडे प्रसाद वीटकर,अनिल ननावरे, अस्लम झारेकरी,रोहित वीटकर मतीन शेख.वंचित बहुजन युवा आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *