
जि.प.प्राथमिक शाळा वरकटणे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
- वरकटणे, ता. करमाळा शाळेत दि. 28/1/2023 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यामध्ये विविध गीतांवर नृत्ये, प्रबोधन नाटके, विनोदी नाटके असे दर्जेदार कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये ग्रामस्थ व पालकांनी भरघोस अशी रोख बक्षिसे दिली.
शाळा व्य. समिती मा. अध्यक्ष संतोष देवकर यांनी शाळेस 32इंची स्मार्ट टीव्ही भेट दिला. तसेच हरिभाऊ मस्कर, अनिल कोकाटे आणि गणेश माने यांनीही प्रत्येकी एक स्मार्ट टीव्ही देण्याचे जाहीर केले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम पार पाडला. यासाठी सर्व ग्रामस्थ व पालक यांचे सहकार्य लाभले. शाळेचे काम कामकाज उत्कृष्ट पद्धतीने चालू असलेले शाळेचे मुख्याध्यापक श्री शिरसट सर, आखाडे सर, व्हटकर सर, बागल सर, मोरे सर, क्षीरसागर मॅडम, चौगुले मॅडम ,भापकर मॅडम यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बागल यांनी केले , तर आभार मुख्याध्यापक संतोष सिरसट यांनी मानले



